तोट्याचा व्यवहार नको!

वर्षभरात आरबीआयने रेपोरेटमध्ये विक्रमी कपात करून कर्जदारांना दिलासा दिला आहे. नवे किंवा जुने कर्जदारांवरील हप्त्याचा बोझा काही अंशी कमी होणार आहे. आरबीआयच्या निर्णयाचा लाभ आता ग्राहकांना मिळण्यास सुरवात झाली आहे. अशा स्थितीत आपण विद्यमान बॅंकेत गृहकर्जावर अधिक व्याज भरत असाल तर तुलनेने कमी व्याज आकारणाऱ्या अन्य बॅंकेत कर्ज स्थांनातरित करु शकतात. अर्थात कर्जाचा कालावधी हा दहा वर्षापेक्षा अधिक असेल तर हा बदल फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय सध्याच्या व्याजदरापेक्षा नवीन बॅंकेचा व्याजदर हा एक टक्‍क्‍यापेक्षा कमी असेल तर बॅंक बदलणे हिताचे ठरेल. त्यापेक्षा कमी कालावधी असेल किंवा व्याजाचे प्रमाण कमी असेल तर तो “घाटे का सौदा’ ठरेल.

दीर्घकाळासाठी फायदेशीर
आपण एखाद्या बॅंकेकडून 50 लाखाचे कर्ज 20 वर्षासाठी घेतले आहे असे समजा. बॅंकेने 10.5 टक्के व्याजदर आकारला असेल तर त्यानुसार घराचा हप्ता हा 49,919 रुपये असेल. जर कर्जाचा कालावधी हा दहा वर्षाचा राहिला असेल आणि बॅंकेला 30 लाख रुपये द्यायचे असेल तर अशा स्थितीत कर्ज स्थानांतरित करणे फायद्याचे राहिल. जर दुसरी बॅंक 9 टक्के दराने गृहकर्ज देत असेल तर आपला हप्ता 38,003 रुपये राहिल. त्यानुसार कर्ज स्थानांतरित करुन आपण हप्त्यात बऱ्यापैकी बचत करु शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एक वर्षानंतर बदलण्याचा पर्याय
गृहकर्जाचा नवा पर्याय निवडण्यासाठी आपण विद्यमान बॅंकेचे किमान 12 हप्ते भरणे अपेक्षित आहे. म्हणजेच एका वर्षानंतर आपण दुसऱ्या बॅंकेत कर्ज स्थानांतरित करण्यास परवानगी मिळते. अर्थात दुसऱ्या बॅंकेत गृहकर्ज स्थानांतरित करणे ही सोपी बाब नाही. नवीन बॅंक आपल्या आर्थिक स्थितीची तपासणी करेल. ट्रॅक रिकॉर्ड आणि सिबिल स्कोर पाहिल्यानंतरच कर्ज स्थानांतरित करण्याची मूभा मिळते. जर आपण वेळेवर हप्ते न भरल्यास त्याचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर अन्य बॅंक देखील आपल्याला गृहकर्ज स्थानांतरित करण्याची सवलत देणार नाही.

फिक्‍स्ड किंवा फ्लोटिंगपैकी अचूक पर्याय कोणता
जर आपण गृहकर्जाचे बॅलन्स ट्रान्सफर करत असाल तर व्याजाचा दर फिक्‍स्ड किंवा फ्लोटिंग यापैकी कोणता फायदेशीर राहिल, असा प्रश्‍न पडतो. जर आपण फिक्‍स्ड रेटमध्ये कर्ज घेतले असेल तर फ्लोटिंगची निवड करु शकता. अनेक बॅंका फ्लोटिंगमध्ये कमी व्याजदरावर गृहकर्ज उपलब्ध करुन देतात. जर आपल्याला फिक्‍स्ड व्याजदरावर कर्ज हवे असेल तर तो पर्याय देखील उपलब्ध आहे. अर्थात बहुतांश बॅंका तीन वर्षासाठी फिक्‍स्ड दरावर गृहकर्ज देतात. त्यानंतर तो व्याजदर फ्लोटिंगमध्ये परावर्तीत केला जातो.

व्याजदराचे आकलन करा
गृहकर्ज ट्रान्सफर करण्यापूर्वी अगोदरच्या बॅंकाकडून आकारण्यात येणाऱ्या व्याजदराची तुलना करा. सध्याच्या काळात गृहकर्जावर 8.40 ते 12 टक्‍क्‍यांपर्यंत व्याजदर आकारला जात आहे. कर्ज स्थानांतरित करताना सरकारी बॅंकाना प्राधान्य द्यायला हवे, असे तज्ञांचे मत आहे. खासगी बॅंकांच्या तुलनेत सरकारी बॅंकांचे व्याजदर कमी असतात. अर्थात त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)