नवी दिल्ली – खबरदारी घ्यायची याविषयीची माहिती मोबाइल फोनवरील कॉलर ट्यूनमधून जनतेला दिली जाते. त्या कॉलर ट्यूनमध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचा वापर केला जाऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
एका दिल्लीस्थित सामाजिक कार्यकर्त्याने संबंधित याचिका दाखल केली आहे. स्वत: बच्चन आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना याआधी करोना संसर्ग झाला. त्यामुळे कॉलर ट्यूनमध्ये बच्चन यांच्या आवाजाचा वापर न करण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला जावा.
बच्चन यांना सरकारकडून आर्थिक मोबदला देण्यात आला. देशासाठी मोफत सेवा देण्याची तयारी असणारे काही प्रसिद्ध करोनायोद्धेही आहेत. सामाजिक कार्यकर्ते या नात्याने काही बच्चन देशसेवा करत नाहीत, अशी भूमिका याचिकेतून मांडण्यात आली आहे. त्या याचिकेवर 18 जानेवारीला सुनावणी होणार आहे.