आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा अन्यथा भाजपकडे काम घेऊन येऊ नका, असा सज्जड दम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना दिला. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित बूथ प्रमुख मेळाव्यात ते बोलत होते.

कोल्हापूर दक्षिण मतदार संघात “आमंच ठरलंय’ची परतफेड म्हणून कॉंग्रेसला मदत करण्याची भूमिका शिवसेनेचे खासदार मंडलिक यांनी जाहीर केली. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.आम्हाला गद्दारी जमत नाही म्हणूच रोष पत्करून आम्ही युतीधर्म पाळला. आता तुम्ही युती धर्म पाळा, नाहीतर एका लुगड्यान बाई म्हातारी होत नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी खासदार मंडलिकांच्या निमित्ताने शिवसेनेला ही डिवचण्याचा प्रयत्न केला.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना 8, तर भाजप 2 जागांवर निवडणूक लढवत आहे. वर्षानुवर्षे शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जंग जंग पछाडले. मात्र शिवसेनेने आपल्या ताब्यातील एकही जागा सोडली नाही. त्यामुळे याचा राग भाजपला आहेच. त्यातच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी कॉंग्रेस उमेदवार आणि आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.