विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नकोय का?

नोंदणीत ५ वर्षांत ४४ टक्क्यांनी घट                                                           

पुणे: विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी हातभार लागावा या उद्देशाने सरकार कडून विविध शिष्यवृत्यांचे वाटप करण्यात येते. राज्यातील हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी या उद्देशाने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. परंतु आता या शिष्यवृत्ती बाबत विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मागील पाच वर्षांमध्ये या शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ४४ टाक्यांची घाट झालीये.

२०१४ मध्ये दोन्ही इयत्ता मिळून १५ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती; तर २०१९मध्ये ही संख्या आठ लाख ६० हजारावर पोहोचली आहे. ही संख्या गतवर्षीपेक्षा थोडी जास्त असली तरी २०१७च्या तुलनेत खूपच कमी आहे. यामुळे अधिकाकधिक विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये सहभागी व्हावे या उद्देशाने नोंदणीची मुदत १५ नोव्हेंबरवरून ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

हि परीक्षा पुढील वर्षी म्हणजे १६ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेतर्फे सांगण्यात आल आहे. तसेच या परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा यासाठी अधिकारी आणि शिक्षकांनी पालकांच्या सभा घेऊन त्यांची जनजागृती करावी, अशा सूचनाही परीक्षा परिषदेतर्फे देण्यात आल्या आहेत.

शिष्यवृत्तीमध्ये झालेली विद्यार्थी नोंदणी 

  • २०१४ – १५ लाख ६९ हजार ५२५
  • २०१५ – १५ लाख ९४ हजार २८९
  • २०१६ परीक्षा झाली नाही
  • २०१७ – ९ लाख ४९ हजार २९९
  • २०१८ – ८ लाख ५८ हजार ४६५
  • २०१९ – ८ लाख ६६ हजार १३१

Leave A Reply

Your email address will not be published.