वाहतूक नियमनाचे पर्याय दिसेना; वाहतूक कोंडी फुटेना

नगर – शहरात वाहतूक कोंडीला सातत्याने सामोरे जावे लागते वाहतूक नियमन (सिग्नल) नसलेल्या ठिकाणी वाहतूक कोंडी होतांना दिसते त्यातल्या त्यात माकट यार्ड, एसटी स्टॅंड चौक आणि सक्कर चौकात वाहतूक खोळंबण्याचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवते.

शहरात डझन भर वाहतूक नियमनाचे दिवे बसविले आहेत मात्र त्यापैकी काही ठिकाणचेच दिवे सुरू असल्याने इतरत्र वाहतूक कोंडी होताना दिसते. मात्र या सर्व गोष्टींमुळे वाहतूक कोंडी वाहतुक नियमनाचे पर्याय दिसेना अन वाहतूक कोंडी फुटेना अशी अवस्था झाली आहे.

नवनागापूर क्रॉम्प्टनग्रीव्हज चौकात, प्रेमदान चौक, पत्रकार वसाहत चौक, डीएसपी चौक, स्टेटबॅंक चौक आदी ठिकाणी सिग्नल सुरू आहेत. मात्र त्यापुढील मार्गात सिग्नल नाहीत आणि त्याच मार्गावर सातत्याने या वाहतूक कोंडी होते, आणि याच ठिकाणी होणाऱ्या अपघातांची संख्याही लक्षणीय आहे.

ह्याभागातील सिग्नल सुरू आहेत त्याभागात युलनेने वाहतूक कोंडी होत नाही, किंबहुना होतच नाही. त्यामुले शहरातील सर्वच वाहतूक नियमन दिवे सुरू करावेत अशीच नागरीकांची मागणी आहे. मात्र स्टेट बॅंक चौक ते कायनेटीक चौक या परिसरातील वाहतूक नियमनांचे दिवे अगदी जवळ आहेत त्यामुळे या वाहतूक नियमनाच्या दिव्यांजवळ वाहतूक खोळंबल्यास पुढील सर्व वाहतूक दिव्यांजवळ वाहतूक कोंडी होत जाईल आणि वाहतुकीचे नियमन चुकेल.

स्टेट बॅंक ते एसटी स्टॅंड पर्यंतचे अंतर वाढविण्याचे प्रयत्न होते. त्यासाठी मार्केट यार्डमध्ये जाण्यासाठीचे गेट बंद करण्यात आले होते. मात्र त्याला यश आले नाही. पर्यायी रस्त्यांचा विचार केला जायला हवा मात्र त्यांचा विचार होत नाही ही शोकांतिका आहे.

दोन चौकांमधील अंतर हीच समस्या
शहरातील अनेक वाहतूक नियमन दिवे एल अँड टी, वसंतपेंट्‌स, सनफार्मा कंपनीच्या सौजन्याने चालविले जात आहेत. मध्यंतरी कायनेटीक चौकातील वाहतूक नियमनाचे दिवे सुरू करण्यात आले होते. मात्र पुन्हा ते काही कारणाने बंद पडले मात्र त्याचे सौजन्य एल अँड टी कडे असल्याने ते पथदिवे केव्हाही सुरू केले जाऊ शकतात मात्र दोन सिग्नल मधील कमी अंतर हीच समस्या असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

पर्यायी रस्त्यांचा विचार व्हावा
कमी अंतर असलेल्या सिग्नल मधील रस्त्यात पर्यायी रस्ते नसल्याने मुख्य अडचण निर्माण झाली आहे. मात्र त्यावर कोणताही उपाय शोधला जात नाही यश पॅलेस सक्करचौकातून नवा टिळकरस्ता आणि यश पॅलेस ते कोठी रस्ता या रस्त्यांचा पर्याय म्हणून विचार केला जावा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.