मुंबई – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. कमी वेळात ती प्रसिद्धीच्या खूप उंच शिखरावर पोहोचली आहे.
अशात गौतमीच्या नृत्यावर टीकाही खूप झाली आहे, तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर अनेकांनी संताप व्यक्त करत तिच्यावर टीका केली होती. नुकतंच अभिनेत्री मेघा घाडगेने गौतमी पाटीलला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. अभिनेत्री मेघा घाडगेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका, देखाव्याची इंग्रजी इथे आजमावू नका, ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही, ज्याला माहीत नाही लावणी त्याला मराठी म्हणू नका… अशी पोस्ट लिहत टोला लगावला आहे.
काय आहे अभिनेत्री मेघा घाडगे यांची पोस्ट