नवी दिल्ली : देशातील राजकीय घडामोडींविषयी भाष्य करणारे सुप्रसीध्द अभिनेते प्रकाश राज यांनी नगरकीता कायद्याबद्दल मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रकाश राज यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आणि एएमयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी बुधवारी कोणालाही आपला आवाज दाबू देऊ नका. असे ट्विट केले आहे.
प्रकाश राज यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत आपले मौन मोडत जामियाच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट करत शांतता मान्य आहे, परंतु आपला आवाज कोणालाही दाबू देऊ नका असे म्हटले आहे. प्रकाश राज यांच्या ट्विटवर कमेंटचा पाऊस पडत आहे. त्याचबरोबर, बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरातील पोलिस कारवाईचा नामांकित व्यक्तींनी निषेद नोंदवला आहे. अभिनेते मोहम्मद झीशान अय्यूब, परिणीती चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा, सुप्रसिद्ध लेखक जावेद अख्तर आदींनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.