लॉकडाऊन नकोच! पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाची भूमिका

पुणे – एकीकडे सरकार मल्टीनॅशनल कंपन्यांना (ऑलमार्ट, फ्लिप काडर्, ऍमेझॉन, झोमॅटो, स्विगी, रिलायन्स) घरपोच खरेदी-विक्री करण्यासाठी परवानगी देत आहे. मात्र, स्थानिक व्यापारी वर्गाला मात्र कोणतीही परवानगी नाही. व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीचा सामना करत आहे, गुढीपाडव्या सारखा मोठ्या आर्थिक उलाढालीचा मुहुर्त यावर्षी हुकला आहे, अशा स्थितीत पुन्हा लॉकडाऊन नकोच! अशी भूमिका पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे घेण्यात आली आहे.

याबाबत संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे म्हणाले की, गुढीपाडवा हिंदू नववर्षासाठी मोठा सण, तरीही सणाच्या दिवशी सर्व बाजार बंद आहे. लॉकडाऊन झाले तर करायचे काय? आम्ही वारंवार सांगून थकलो की लॉकडाऊन हा पर्याय होऊच शकत नाही, नागरिक सुध्दा लॉकडाऊनच्या विरोधात आहेत. समाजातील सर्व घटक लॉकडाऊनच्या विरोधात आहेत. त्यामुळेच सरकारने दुटप्पी भूमिका न ठेवता आणि लॉकडाऊन न करता सर्वांना व्यवसाय चालू करण्यासाठी परवानगी द्यावी.

ऑनलाइन खरेदी प्रमाण 1 ते 2 टक्‍के
दागिने खरेदीसाठी ग्राहक ऑनलाइन माध्यमाकडे वळत आहे. ही एक सकारात्मक बाब असली तरी प्रत्यक्ष खरेदीच्या तुलनेत ऑनलाइन खरेदीचे प्रमाण हे एकूण खरेदीच्या केवळ 1 ते 2 टक्‍के इतकेच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी व्यवहाराचा पल्ला गाठण्यास अजून बराच अवधी लागेल, असे चंदूकाका सराफचे संचालक सिद्धार्थ शहा यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.