बॉलीवूडचे स्टंट डायरेक्टर श्याम कौशल यांचा मुलगा विकी कौशल हा “उरी’ चित्रपटानंतर अक्षरशः रातोरात स्टार बनला. आज विकी स्वतःही हे मान्य करतो की मीडिया त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचीही दखल घेत असतो. “भूत’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना विकी म्हणाला की, एकावेळी एकाहून अधिक चित्रपटांमध्ये व्यस्त राहिल्यास गोष्टी बिघडण्याची शक्यता असते.
त्यामुळेच मी असे करणे टाळण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या मी माझा पूर्ण वेळ “भूत’साठी देत आहे. दिग्दर्शक भानुप्रताप सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन अत्यंत उत्तम केले आहे. ते स्वतः या चित्रपटाचे लेखकही आहेत. भूत’ चित्रपटानंतर विकी आता “सरदार उधम सिंह” या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर करण जोहरचा “तख्त’ आणि मेघना गुलजारचा “मानेकशॉ’ हे चित्रपट फ्लोअरवर येतील.
विकी सांगतो की, कोणत्याही चित्रपटाचा विषय आणि माझी भूमिका यांविषयी मी नेहमी चिंतन करत असतो. या दोन गोष्टी आवडल्यानंतरच मी प्रस्ताव स्वीकारतो. त्यामुळेच उरीनंतर लगेचच मी सुजीत सरकार यांचा “उधम सिंह’ हा चित्रपट स्वीकारला. वेळ मिळाल्यानंतर या चित्रपटातील महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरणही आटोपले. मी खूप हुशारीने दिग्दर्शकांची निवड करत असतो.
View this post on Instagram
Debut Shot! ??#dabbooratnanicalendar Thank You… @dabbooratnani @manishadratnani !
यामध्ये सुजितदांसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी दिग्दर्शकांचा समावेश होतो. “भूत’चे दिग्दर्शक भानुप्रताप असोत किंवा “तख्त’चा दिग्दर्शक करण जौहर असो अशा दिग्दर्शकांसोबत काम करण्याला मी नेहमीच प्राधान्य देतो. सुदैवाने मला चांगल्या संधी मिळत आहेत आणि त्यामुळे मी त्या सोडत नाही.