मास्क वापरताना ‘या’ चुका अजिबात करू नका !

करोना संकटकाळात आता सगळी शहरे अनलॉक झाली असल्यामुळे रोज घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. करोना संसर्गापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझर वापरणे आणि मास्क वापरणे या अत्यावश्यक बाबी बनल्या आहेत. त्यातही बाहेर पडतानातसेच कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने वापरण्यात येणारे मास्क तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे? WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने नुकताच चुकीच्या पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या मास्कसंदर्भात एक व्हिडिओ रिलीज केला आहे. चला तर, जाणून घेऊयात मास्क वापरताना कोणत्या चुका टाळाव्यात.

ढिले मास्क – खूप लोकं लूज किंवा ढिले मास्क वापरतात. मास्क वापरताना तो व्यक्तीच्या चेहऱ्यावर व्यवस्थित फिट बसणारा हवा. म्हणजे वरून, खालून किंवा कोणत्याही दिशेने व्हायरस तुमच्या नाकात आणि तोंडात प्रवेश करू शकणार नाही.

नाकाखाली मास्क वापरणं – आपण नाकानेच श्वास घेत आणि सोडत असल्यामुळे मास्क लावताना नाक आणि तोंड दोन्ही पूर्ण झाकले गेले पाहिजेत. मात्र, काही लोक सोयीसाठी मास्क लावताना नाक बाहेर काढून फक्त तोंडावर मास्क चढवतात, जे पूर्णपणे अयोग्य आहे.

बोलताना मास्क काढणं – एकमेकांशी बोलताना असुविधा होत असल्यामुळे लोक सरळ मास्क काढतात. मात्र, यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्यास मदतच होते, हे लक्षात घेतले पाहिजे.

मास्कला वारंवार हात लावणं- जवळपास 99 टक्के लोकं ही चूक करतात. बरेचजण मास्क लावल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने काढतात आणि परत लावतात. असे केल्याने तुम्ही मास्क लावण्याचा मूळ हेतू साध्य करू शकत नाही.

मास्कची अदलाबदली – ही चूक परिवारातील सदस्य नेहमीच करतात. एकाच परिवारात राहणारे सदस्य एकमेकांचे मास्क शेअर करतात. ही अतिशय चुकीची आणि घातक सवय आहे. लक्षात ठेवा, करोना व्हायरसचे 50 टक्क्यांहून अधिक प्रकरणात व्यक्तीमध्ये करोनाचे लक्षण दिसत नाहीत. बाहेरून अशा व्यक्ती निरोगी दिसतात. अशात मास्कची अदलाबदली व्हायरस पसरण्याचे कारण ठरू शकते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.