‘घरटं सोडायचं नाही, काळजी घ्या’ : शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांचा सामाजिक संदेश

लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संदेश

पुणे :  राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. करोना साखळी तोडण्यासाठी एक प्रकारे हा कडक लाॅकडाऊन असणार आहे. शासन व प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांकडून तशाच प्रकारचा प्रतिसाद अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना ‘करोना संसर्गाचा वाहक की देशाचा सहाय्यक बनणार? असा प्रश्न विचारत ‘घरटं सोडायचं नाही, काळजी घ्या’, असा सामाजिक संदेश छायाचित्रातून राज्याचे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे.

करोनाबाबत जनजागृतीची अनेक पोस्टर्स त्यांनी सोशल मीडियावर प्रकाशित केली आहेत. त्यापैकी ‘करोना संसर्गाचा वाहक की देशाचा सहाय्यक बनणार?’ आणि ‘घरटं सोडायचं नाय..!’ ही त्यांनी पोस्ट केलेली छायाचित्रे खूपच व्हायरल झाली आहेत.

करोना विषाणू तुमच्या घरी येणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला आणायला बाहेर जात नाही.
डाॅक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे माणसांतील देवांना सलाम, करोनाची साखळी तोडायचीय, कुटूंबाला आणि देशाला करोनापासून वाचवायचय,

लक्षात ठेवा ही लढाई जिंकायची आहे हरायची नाहीय, बहिरे व्हा पण अफवांना थारा देऊ नका,
अफवा करोनापेक्षा भयंकर असू शकतात कुटुंबासोबत घरात की एकटं रुग्णालयात तुम्ही ठरवायचं, करोनावर एकच उपाय, टाकू नका घराबाहेर पाय, कंसापेक्षा क्रूर आणि रावणापेक्षा मायावी आहे कोरोना, ठेवूया एक मीटर सुरक्षित अंतर , कोरोना होऊ दे छूमंतर अशा विविध शब्द व चित्ररुपी संदेशांचा त्यात समावेश आहे.

यापुर्वी क्षीरसागर यांनी सातारा येथे जिल्हास्तरावर काम करत असताना शैक्षणिक उपक्रमावर बरोबरच करोना जागृतीचे अनेक उपक्रम राबविले होते. त्याचे राज्यभर कौतुक झाले. मराठी नववर्षाच्या निमित्ताने ‘गुढी उभारू आरोग्याची…!’हा सामाजिक संदेशही त्यांनी सहकुटुंब दिला होता. त्याचे छायाचित्र राज्यभर गेले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.