मुंबई : संपूर्ण जगात दहशत पसरवणाऱ्या करोनाच्या नव्या व्हेरियंटने म्हणजेच ओमायक्रॉनने आता हळूहळू देशात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. आज राज्यात आठ नवीन ओमायक्रॉनबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या २८ वर पोहचली आहे.
राज्यात मंगळवारी आढळलेल्या आठ ओमायक्रॉनबाधितांमध्ये मुंबईत सात जण तर वसई-विरारमधील एका रूग्णाचा समावेश आहे. तर, आतापर्यंत राज्यभरात आढळून आलेल्या २८ ओमायक्रॉन बाधितांपैकी ९ रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयामधून सुट्टी देखील मिळालेली आहे.
8 more patients found infected with #Omicron in the state. Out of these 7 are from Mumbai & 1 patient is from Vasai Virar. Till date, a total of 28 patients infected with Omicron have been reported in the state. Out of these, 9 have been discharged after negative RT-PCR test. pic.twitter.com/AptIVHMk8h
— ANI (@ANI) December 14, 2021
याचबरोबर महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६८४ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत, तर ६८६ रूग्ण कोरनामुक्त झाले आहेत. याशिवाय २४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६६,४५,१३६ झाली आहे. राज्यात आजपर्यंत ६४,९३,६८८ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, १,४१,२८८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ६ हजार ४८१ आहे.