मालमत्तेपासून उत्पन्न लपवू नका!

प्राप्तिकर विवरण भरण्याचा हा शेवटचा महिना आहे. 31 ऑगस्टपर्यंत कोणत्याही स्थितीत रिटर्न भरावे लागतील, अन्यथा नियमाप्रमाणे दंड भरावा लागेल. रिटर्नमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश करावा, कोणता करण्याची गरज नाही, यावर अजूनही करदाते संभ्रमात असतात. कारण प्राप्तिकर कायद्याचे पुरेसे आकलन नसल्याने करदात्याचा गोंधळ उडतो. कोणते उत्पन्न करपात्र आहे आणि कोणत्या उत्पन्नावर सवलत मिळू शकते, याबाबतही काही जण विचारात असतात. यात घरभाड्यापासून मिळणारे उत्पन्न हा महत्त्वाचा विषय. जर एकापेक्षा अधिक घर असेल आणि दुसरे भाड्याने दिले किंवा रिकामे असेल तर प्राप्तीकर विवरणात त्याचा समावेश करावा लागेल.

प्राप्तिकराची मोजमाप करताना मालमत्तेपासून होणाऱ्या उत्पन्नाचा समावेश करणे आता आवश्‍यक झाले आहे. ही माहिती कर वाचवण्यासाठी देखील महत्त्वाची ठरते. जर करदात्याने भाड्याने दिलेले घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेतले असेल आणि ते कर्ज अद्याप सुरू असेल तर व्याजापोटी भरण्यात येणाऱ्या रकमेवर करसवलत मिळू शकते. तसे पाहिले तर करदात्याचे एकूण करपात्र उत्पन्न हे अनेक भागात विभागले जाते. जसे करदाता नोकरी करत असेल आणि वेतनापासून उत्पन्न आणि अन्य स्रोतांपासूनचे उत्पन्न. याचाच अर्थ भाड्यापासून होणाऱ्या उत्पन्नाचा प्राप्तिकर विवरणात समावेश करावा लागेल. साहजिकच त्यावर कर भरावा लागतो. आर्थिक वर्ष 2018-19 यासाठी आयटीआर भरताना करदात्यासाठी मालमत्तेचे ब्रेकअप देणे अनिवार्य आहे.

गृहकर्जाच्या व्याजावर लक्ष ठेवा
कोणतीही मालमत्ता खरेदी करताना त्याच्या बांधकामाचा खर्च किंवा डागडुजीच्या खर्चासाठी घेतलेल्या कर्जापोटी देण्यात येणाऱ्या व्याजाला मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नाला प्राप्तीकर डिडक्‍शनच्या रूपात दावा करू शकतो.

हाऊस टॅक्‍ससाठी दावा करू शकता
आपल्या मालमत्तेवर भरलेला कोणताही कर असो तो हाऊस टॅक्‍स डिडक्‍शनच्या रुपाने दावा करू शकतो.

ग्रॉस ऍन्यूअल व्हॅल्यू आणि नेट ऍन्यूअल व्हॅल्यू
वर्षभरातील भाड्यावर आकारले जाणारे मूल्य म्हणजे ग्रॉस ऍन्यूअल व्हॅल्यू होय. त्याची गणना चार पद्धतीने केली जाते. वार्षिक भाडे, म्यूनिसल व्हॅल्यू,योग्य भाडे आणि स्टॅंडर्ड रेट.

प्राप्तिकर अधिनियमातील तरतुदी
मालमत्तेच्या भाड्यातून होणारे उत्पन्न रिटर्नमध्ये समाविष्ट केल्यास त्यावर कर देणे बंधनकारक ठरते. जर मालमत्ता भाड्याने दिलेली नसेल तर संभाव्य भाड्यावर देखील कर भरावा लागतो.

तीन गोष्टीच्या आधारे भाड्याचे उत्पन्न करदात्याच्या एकूण उत्पन्नात सामील केले जाते. 1) करदाता हा स्वत: मालमत्तेचा मालक आहे.2) मालमत्ता ही घर, इमारत किंवा प्लॉटच्या रूपातून असेल तर 3) मालमत्तेचा वापर हा घरमालक आपल्या व्यवसायासाठी किंवा अन्य व्यावसायिक कारणासाठी नाही, तर अन्य उद्देशासाठी करत असेल तर

डिडक्‍शन आवश्‍यक
भाड्याच्या रुपाने मिळणाऱ्या उत्पन्नाची गणना ही प्राप्तिकर अधिनियम 24 नुसार विविध डिडक्‍शन किंवा कपात करून शुद्ध कर योग्य उत्पन्नात केली जाते. या डिडक्‍शनमध्ये 30 टक्के स्टॅंडर्ड डिडक्‍शन आणि होम लोनच्या व्याजापोटी होणारा भरणा समाविष्ट आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×