अफवांना बळी पडू नका! संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलं स्पष्टीकरण

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा कहर अजून ही पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,03,05,788 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,49,218 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा हाच संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केंद्र आणि राज्यसरकार कडून केले जात आहेत.

आज (दि. २) पासून कोरोना लसीचे ड्राय रन केले जाणार आहे. लसीकरण कार्यक्रम राबवतांना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येत आहे. याआधी देशातील चार राज्यांतील दोन दोन जिल्ह्यात लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ड्राय रन घेतला होता.

तर एक एकीकडे कोरोना लस किती रुपयांना मिळणार याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “संपूर्ण देशभरात कोरोनाची लस ही मोफत दिली जाणार आहे’ अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. ते प्रसामाध्यमांशी बोलत होते. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.