खते, बियाणांच्या अफवांना बळी पडू नका

शिरूर (प्रतिनिधी) -बी बियाणे, खते, किटकनाशके मुबलक प्रमाणात आधारभूत किमंतीत उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी. अफवांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, अशी सूचना खरीप हंगाम पूर्व तयारी बैठकीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिल्या आहेत. आरोग्य, खरीप हंगाम पूर्व तयारी, पाणीटंचाई, मनरेगा, शरद भोजन योजना आदीबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काकडे, जिल्हा परिषद सद्‌स्या सुनीता गावडे, कुसुम मांढरे, सुजाता पवार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, पंचायत समितीचा सभापती मोनिका हरगुडे, माजी सभापती विश्‍वास कोहोकडे, प्रभारी गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, सहायक गटविकास अधिकारी कोल्हे, पंचायत समिती कृषी अधिकारी निलेश बुधावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी करोनासंदर्भात केलेल्या उपाययोजनाचा आढावा घेण्यात आला. कोविड केअर सेंटर समाजकल्याण विभागाचा वसतिगृह येथे सुररू केल्याची माहिती देण्यात आली. शिक्रापूर, न्हावरे, तळेगाव ढमढेरे येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा सूचना देण्यात आल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.