संकट समयी राजकारण करू नका- धनंजय मुंडे

 

मुंबई: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील दत्त साखरकारखाना परिसरात झालेल्या वादळाने कारखाना परिसरात वास्तव्यास असलेल्या ऊसतोड मजुरांच्या पालांचे नुकसान झाले. माझ्या सूचनेवरून प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्यासह कारखान्याचे एमडी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली, मजुरांची योग्य व्यवस्था केली होती. मात्र, राजकारण करून लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका, असे नाव न घेता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना इशारा दिला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाटयाने वाढत आहे.याचा सर्वात मोठा कामगारांना बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ऊसतोड कामगारांचा प्रश्न मांडत आहेत. त्यांच्यासाठी तातडीने निर्णय घेतला जावा अशी मागणी सरकारकडे करत आहेत. ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय झाली पाहिजे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली होती. उद्याच्या उद्या निर्णय जाहीर करण्यात यावा असंही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान आज या कामगारांना घरी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

https://www.dainikprabhat.com/the-laborers-will-be-forced-to-go-home-state-government-decision/

यापूर्वी घडलेल्या परिस्थितीबाबत धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर स्पष्टीकरण दिले होते. राज्यात विखुरलेल्या ऊसतोड मजुरांना टप्प्याटप्प्याने स्वगृही आणण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. मजुरांची संख्या, त्यांची आरोग्य तपासणी, गावकऱ्यांची सुरक्षा याचा विचार करून आज निर्णय घेतला जाईल.

“इथं लेकरांच्या जेवणात चिखल…” ; ऊसतोड कामगार प्रश्नावरून पंकजा मुंडे भडकल्या

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.