गर्दी करून नका; प्राणीसंग्रहालय बंदच

कात्रज येथील प्राणी संग्रहालय प्रशासनाचे आवाहन

कात्रज, – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर शासनाने प्राणी संग्रहालये सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. परंतु, उद्याने खुली करण्यात आल्याच्या गैरसमजातून नागरिक कात्रज येथील स्व.राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या गेटवर सुट्ट्यांच्या दिवशी बालचमूंसह गर्दी करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी करोनाचा धोका लक्षात घेता लहान मुलांसह गर्दी करू नये, असे आवाहन प्राणी संग्रहालय प्रशासनाने केले आहे.

अनलॉकमध्ये टप्प्याटप्प्याने चित्रपटगृह, मंदिरे, हॉटेल यासह अन्य पर्यटन स्थळे उघडण्यात आली. तसेच, शहरातील जॉगिंग ट्रॅक असलेली काही मोजकी 41 उद्यानांत नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. परंतु, प्राणी संग्रहायलांना अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, उद्याने समजून शहरासह अन्य भागातील पर्यटक कात्रज येथील स्व.राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाला भेट देण्यासाठी येत आहेत. रविवारासह अन्य सुट्ट्यांच्या दिवशी मोठी गर्दी होत आहे. करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने वाढणारी गर्दी लहानमुलांसाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे प्राणी संग्रहालय सुरू करण्यात आली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असून गर्दी करू नये, असे आवाहनही प्रशासनकडून करण्यात आले आहे. तर, सोशल डिस्टन्सिंग तसेच अन्य सुरक्षा नियमांर्गत प्राणी संग्रहालय सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनकडे केली जात आहे.

देशभरासह राज्यातील प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी खुली करण्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. जोपर्यंत शासकीय आदेश येत नाही. तोपर्यंत प्राणीसंग्रहालय ही खुली करण्यात येणार नाही. कृपया नागरिकांनी लहानमुलांसह गर्दी करू नये.

– डॉ. राजकुमार जाधव, संचालक, स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रज

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.