प्रभास अत्यंत मितभाषी आणि सौम्य स्वभावाच ऍक्टर आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. “साहो’च्या ट्रेलर लॉंचच्यावेळी त्याची तुलना सलमान, शाहरुख आणि आमिर या तिन्ही खानांबरोबर केली. त्या प्रश्नाला प्रभासने छान उत्तर दिले आहे.
“या तिन्ही खानांनी आम्हाला इतकी दशके खूप प्रेरणा दिली आहे. त्यामुळे माझी तुलना त्यांच्याबरोबर करणेच चुकीचे आहे.’ असे तो म्हणाला. तिन्ही खानांबरोबरच्या स्पर्धेबाबत विचारले असता प्रभासने प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार महिलेचे आभार मानले आणि तो चक्क उठून निघून गेला. प्रभासने वाद निर्माण होण्यापेक्षा तिथून निघून जाणेच पसंत केले.
“बाहुबली’ आणि “बाहुबली 2′ च्या प्रचंड यशानंतर प्रभासची डिमांड एकदम वाढली आहे. सुपरस्टार म्हणून त्याची तुलना सलमान, शाहरुख आणि आमिरबरोबर होणे स्वाभाविकच आहे. मात्र स्पर्धेच्या युगात कलाकार स्वतःची प्रगती गमावून बसतो, हे प्रभासला पक्के ठाऊक आहे.
आपल्या लागोपाठ दोन हिट सिनेमांच्या यशाची पुनरावृत्ती त्याला “साहो’मधून करायची आहे. ऍक्शन पॅक्ड “साहो’मध्ये त्याच्याबरोबर श्रद्धा कपूर, मंदिरा बेदी, एवलीन शर्मा, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, आदी कलाकार असणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस “साहो’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.