जिनिव्हा – संयुक्त राष्ट्राच्या शरणार्थ्यांसाठीच्या उच्चायुक्तालाने अफगाणिस्तानसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
अफगाणिस्तानमधून बाहेर पडलेल्या शरणार्थ्यांनी “परत येऊ नये’ असे या मार्गदर्शक सूचनेमध्ये म्हटले आहे. या शरणार्थ्यांना जबरदस्तीने माघारी पाठवण्यात येऊ नये असेही या मार्गदर्शक सूचनेमध्ये म्हटले आहे.
तालिबानच्या राजवटीमध्ये सुरक्षा आणि मानवी हक्कांबाबतची स्थिती खूपच खालावलेली आहे.
मात्र अनेक देशांमध्ये शरणार्थ्यांना प्रवेश नाकारण्यातच येत आहे. त्यामुळे संबंधित देशांसाठीही ही मार्गदर्शक सूचना देण्यात आली आहे.
सध्या निर्माण झालेली परिस्थिती मानवी हक्कांच्या संदर्भाने खूपच खालावलेली आहे. प्रामुख्याने महिला आणि मुलींचीही सुरक्षा खूपच धोक्यात आली आहे.
तालिबानच्या गेल्यावेळच्या राजवटीतील महिलांची स्थिती काय होती हे लक्षात घेतले तर या नागरिकांची सुरक्षा जपणे अधिक आवश्यक आहे, असेही संयुक्त राष्ट्राच्या शरणार्थी विषयक उच्चायुक्तालयाने म्हटले आहे.