रामजन्मभूमीच्या निर्णयाला “नमस्ते सदा’

विजयाचा जल्लोष न करण्याचे संघ परिवार, विहिंपचा निर्णय; एनआरसीला पाठींच्याने सरकारला दिलासा

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाचा निर्णय हिंदुंच्या बाजूने लागला तर देशव्यापी जल्लोष आणि विजयी मिरवणुका काढायच्या नाहीत, तसेच राष्ट्रव्यापी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला (एनआरसी) पूर्ण पाठींबा असे दोन महत्वाचे निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येथे झालेल्या महत्वाच्या बैठकीत घेण्यात आले. त्यामुळे भारतीय जनता पक्षावरील तणाव कमी झाला एवढेच नव्हे तर तर पक्षाच्या चेहऱ्याचर हसूही आले.

संघ परिवारातील संघटना, विश्‍व हिंदू परिषद यांच्यातील संघाच्या समन्वय समितीच्या बैठकीळा सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. अयोध्या पाप्रकरणावर मुख्य न्या, रंजन गोगोई निवृत्त होण्यापुर्वी म्हणजे 17 नोव्हेंबरपुर्वी हिंदुच्या बाजूने निकाल दिल्यास या बैठकीत विश्‍व हिंदू परिषदेसह रा. स्व. संघ आणि त्यांच्या परिवारातील कोणत्याही संघटनांनी विजयी मिरवणुका काढू नयेत असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रा. स्व. संघाने एका निवेदनाद्वारे काहीही निकाल लागला तरी त्याचा सन्मान ठेवून देशात कायदा आणि सुन्यवस्था कायम ठेवावी, असे आवाहन केले.

अलाहाबाद उच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये राजकीय पक्षांनी प्रगल्भता दाखवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायलयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर ऑक्‍टोबर महिन्यात दिर्घकाळ युक्तावाद झाल्यानंतर त्यावरील निकाल राखून ठेवला आहे. संघाच्या या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष हेही उपस्थित होते.

यापुर्वी ही बैठक हरिद्वारला होणार होती. मात्र, त्याचे स्थळ बदलण्यात आले. तसेच अंतिम निकाल लक्षात घेऊन अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले. रामजन्नभूमी चळवळीसाठी आग्रही असणाऱ्या विश्‍व हिंदु परिषदेला विजयी जल्लोष केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंताजनक स्थिी निर्माण होण्याची बीती भाजपा सरकारला होती. त्यापसून तर दिलासा मिळालाच या शिवाय राष्ट्रव्यापी एनआरसीला पाठींबा मिळाल्याने भाजपाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटले.

हे दोन्ही ठराव एकमतान मंजूर झाले. त्यावेळी सदस्यांनी भारतमाता की जय च्या जोरदार घोषणा दिल्या. रा. स्व. संघाने एनआरसी बाबत प्रथमच जाहीर भूमिका घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.