मला सारा बॉयफ्रेंड म्हणू नका…

मुंबई – मागच्या काहीकाळापासून कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्यातील अफेअर चर्चा सुरु आहे.यातच हे दोघेही अनेकदा एकमेकांसोबत एकत्रित फिरतांना दिसतात.

 

View this post on Instagram

 

Happy Birthday Princess @saraalikhan95 ❤️ And Eid Mubarak (this time without the mask )

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

कधी लखनौमध्ये एकत्रित प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून बाहेर पडलेल्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे व्हिडिओ ऑनलाइन बघायला मिळतो तर कधी साराच्या वाढदिवसाला कार्तिक कामातून वेळ काढून तिला भेटायला गेला होता.


मात्र आता कार्तिकनं पॅपराजीला सारासोबत त्याचे फोटो काढू नयेत आणि त्याला साराचा बॉयफ्रेंड म्हणू नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे या दोघांचं ब्रेकअप झालं की काय अशी शंका सर्वांना येऊ लागली आहे.


त्यांनी आपल्यातील रिलेशन दडवून आणखी चर्चेला निमंत्रण द्यायचे नाही, असेच ठरवलेले दिसते आहे. दरम्यान, इम्तियाझ अलीच्या “आजकल’मध्ये कार्तिक आणि सारा दिसतील. हा सिनेमा 2020 मध्ये व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने रिलीज होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.