सुषमा स्वराज आपल्यामध्ये नाहीत यावर विश्‍वास बसत नाही -दलबिर कौर

नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी सांगत प्रत्येकांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. यावेळी पाकिस्तानच्या कैदत असणाऱ्या सरबजीत सिंह यांच्या भगिनी दलबीर कौर यांनी देखील आपल्या भावना व्यक्‍त करत सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

स्वराज या खूपच मदतशील होत्या त्यांच्या या गुणाचा अनेकांनी अनुभव घेतला आहे. परराष्ट्र मंत्री असताना तर त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली होती. जगात कुठल्याही कोपऱ्यात एखादा भारतीय अडचणीत असला आणि त्याने मदतीसाठी भारत सरकारकडे याचना केली तर सुषमा स्वराज या तत्काळ त्या व्यक्तीच्या मदतीसाठी सुत्रे हालवत असतं, असे सरबजीत सिंह यांच्या भगिनी दलबीर कौर यांनी म्हटले आहे. दलबीर कौर म्हणतात, सुषमा स्वराज आपल्याला सोडून गेल्या आहेत यावर माझा विश्वासच बसत नाही. त्या खूपच लवकर आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी नेहमीच इतर देशात अडलेल्या भारतीयांना मदतीचा हात दिला, त्या नेहमची मदतीसाठी तत्पर असायच्या. हमीद अन्सारी, सरबजीत, गीता आणि कुलभूषण जाधव अशा पाकिस्तानात अडकलेल्या भारतीयांना त्यांनी मोलाची मदत केली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना करते असे दलबीर कौर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)