…इथे ओशाळला करोना; वीकेंड लॉकडाऊननंतर पुणेकरांची खरेदीसाठी झुंबड

पुणे – करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जमावबंदीही लागू आहे. तरीही, मार्केटयार्ड पाठोपाठ महात्मा फुले मंडई आणि परिसरात सोमवारी भाजीपाला, फळे, किराणा, धान्य खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली होती. गुढीपाडव्यासाठी आंबे, फुले आणि किराणा खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

शिवनेरी पथ रस्त्यावर सकाळपासूनच वाहतूक कोंडी होती. बाजार समिती कर्मचारी पहाटेपासून गर्दी कमी करण्यासाठी, कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, त्यांचीही दमछाक झाली. वीकेंड लॉकडाऊनमुळे शहरातील सर्वच बाजारपेठा बंद होत्या. तसेच, पुढील दोन ते तीन दिवसांत लॉकडाऊन होण्याची भीती असल्याने पुणेकरांनी गर्दी केली होती. शहरातील सामान्य नागरिक, व्यापाऱ्यांची बाजारात झुंबड उडाल्याचे दिसून आले.

उपनगरांतही “बाजार’
उपनगरांमध्ये किराणा दुकानात सोमवारी सकाळपासूनच रांगा होत्या. लॉकडाऊनच्या भीतीने नागरिक किराणा माल भरुन ठेवत होते. तुळशीबाग व मंडई परिसरात रस्ता हार -फुले, कडू निंबाच्या डहाळ्या, गाठी विक्रेत्यांनी व्यापला होता. तर मिठाईच्या दुकानांमध्येही गर्दी झालेली दिसत होती. काही ठिकाणी पोलिसांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करावे लागले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.