मुंबई – सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. आता पर्यंत या प्राणघातक विषाणूपासून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, या प्राणघातक विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर’ यांनी काही विशेष सल्ले दिले आहेत. दीदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.
We as responsible citizens need to maintain proper hygiene and cleanliness, those with cough and cold should maintain a social distance to avoid further spread. Follow the guidelines given by health agencies. Stay safe and healthy! God bless
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) March 17, 2020
दीदी म्हणाल्या, “नमस्कार, सध्या जगभरात फैलावलेला करोना हा एक प्राणघातक विषाणू आहे. मात्र गोंधळू नका, घाबरु नका, सावध राहा आणि अफवा पसरवू नका. तसेच दीदी पुढे म्हणाल्या, ‘आपण जबाबदार नागरिक आहोत, स्वच्छता राखा राखण्याची गरज आहे. सर्दी, ताप, खोकला असलेल्या लोकांपासून लांब राहा. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करा. सुरक्षित आणि निरोगी रहा!’ असं लता दीदी म्हणाल्या आहेत.
Namaskaar,
The Coronavirus pandemic is very real and disturbing. At the same time, we shouldn’t panic and spread rumours.— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) March 17, 2020