‘घोड्यावर बसून गाढवपणा, आमदाराच्या कृत्यानंतर काय करणार बाबरसेना?’; विरोधकांकडून नवघरेंच्या कृतीचा समाचार

मुंबई – मराठवाड्यातील वसमतमध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दाखल झाला. शहरात दाखल होताना ट्रकमध्येच असलेल्या पुतळ्याचे तालुक्याचे आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मात्र या वेळेचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये आमदार नवघरे हे महाराजांच्या अश्वावरच चढून महाराजांच्या गळ्यात हार घालताना दिसत आहेत. मात्र, विरोधकांनी हा या घटनेवरुन राष्ट्रवादीचे आमदार नवघरे यांना लक्ष्य केले आहे.

आमदार नवघरे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींना या घटनेचा तीव्र शब्दात विरोध केला आहे. ,रयत संघटनेचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही ट्विटरवर शिवसेनेला तिखट सवाल केला आहे.

महाराजांच्या घोड्यावर बसण्याचा ‘गाढव’पणा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ‘राजू नवघरे’ यांच्या या कृत्यानंतर आता बाबरसेना काय करणार. राष्ट्रवादीच्या आमदाराला चपलेने मारणार की भवनवर बोलून फुलाचा हार घालणार?, असा खोचक प्रश्न सदाभाऊ खोत यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. तसेच, या घटनेचा जाहीर निषेधही नोंदवला आहे.

तर दुसरीकडे  भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून, याला सत्तेचा माज म्हणतात असे म्हटलंय. तर आमदार नवघरे यांनीही याबाबत बोलताना माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना त्यांना रडू कोसळल्याचे दिसून आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.