झकीर नाईकच्या संस्थांना संशयास्पद मार्गांनी देणग्या

नवी दिल्ली – वादग्रस्त इस्लामी व्याख्याता झकीर नाईकच्या संस्थांना काही संशयास्पद आणि गूड हितचिंतकांकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. झकीर नाईकच्या वैयक्तिक बॅंक खात्यावरही काही अज्ञात व्यक्‍तींकडून कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे, अशी धक्कादायक माहिती सक्‍तवसुली संचलनालयाच्या तपासादरम्यान पुढे आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गूढ देणग्या झकीर नाईकला मिळाल्या असून त्याचा विनियोग मुस्लिम तरुणांना चिथावण्यासाठी आणि द्वेषभावना पसरवणाऱ्या व्याख्यानांसाठी वापरण्यात आल्याचे “ईडी’ने म्हटले आहे.

मुंबईस्थित “इस्लामिक रिसर्च फौंडेशन’ ची स्थापना झकीर नाईकने केली. त्या संस्थेला देशातील तसेच परदेशातील अनेक देणगीदारांकडून देणग्या मिळाल्या आहेत. यामध्ये संयुक्‍त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कुवैत, ओमान आणि मलेशियासह अन्य देशांमधील देणगीदारांचा समावेश आहे. या देणग्या स्वीकारण्यासाठी इस्लामिक रिसर्च फौंडेशनने अनेक बॅंक खाती सांभाळली आहेत. या खात्यांवर झकीर अब्ब्दुल करीम नाईकचे नियंत्रण असायचे. सिटी बॅंक, डीसीबी बॅंक लिमिटेड आणि युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये ही खाती आहेत. या खात्यांवर निधी जमा करणाऱ्या देणगीदारांची नावे अज्ञात आहेत. त्यांच्या नावांचा उल्लेख “हितचिंतक’ म्हणून नोंदवला गेला आहे.

या देणग्या रोखीने जमा केल्या गेल्या आहेत आणि पावत्यांवरही देणगीदाराचा संपर्काचा तपशील नाही. त्यामुळे या देणग्यांबाबत संशय निर्माण होत आहे. “आयआरएफ’ला 2003-04 ते 2016-17 या कालावधीमध्ये अशाप्रकारच्या 64.86 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असल्याचे “ईडी’ने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here