वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण पॉर्न स्टार नुकसान भरपाई प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात खटला दाखल केला जाणार आहे. अशा प्रकरणात खटला चावलण्यात येणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वेळी पॉर्न स्टारला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिल्या हे प्रकरण आहे. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
अमेरिकेतील मॅनहॅटन येथील ग्रँड ज्युरीने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठा निकाल दिला. 2016 च्या निवडणूक प्रचारादरम्यान प्रौढ स्टारला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिल्याबद्दल ट्रम्प यांना दोषी ठरवले आणि महाभियोगाच्या बाजूने मतदान केले. आता गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे ते अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
तर दुसरीकडे पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या वकिलांनी हे सांगितलं आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होणं आणि त्यानंतर त्यांच्याविरोधात खटला चालणार ही बाब समोर येणं म्हणजेच कायद्यापेक्षा मोठं कुणीही नाही हेच दाखवून देणारे उदाहरण ठरले आहे.