Donald Trump oth Ceremony। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे येत्या 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. अमेरिकेच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच वेळ असेल जेव्हा राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला परदेशी नेते देखील उपस्थित राहणार आहेत. याचे कारण डोनाल्ड ट्रम्प यांना या शपथविधी सोहळ्याला ‘ग्लोबल इव्हेन्ट’ म्हणून जगासमोर म्हणून सादर करायचा आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, “डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमने जानेवारीमध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी जागतिक नेत्यांना निमंत्रण पाठवण्यास सुरुवात केली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जिनपिंग यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. व्हाईट हाऊसच्या नवनिर्वाचित प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. याविषयी बोलताना, “होय, हे खरे आहे की चीनच्या अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. ट्रम्प हे सर्व देशांच्या नेत्यांशी खुल्या संवादाचे समर्थक आहेत याचे हे उदाहरण आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
मात्र अद्याप चीनकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात आहे. जागतिक पातळीवर तणाव वाढत असताना जिनपिंग यांना निमंत्रण देण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी चीनवर शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे.
आतापर्यंत कोण-कोणत्या जागतिक नेत्यांना दिले निमंत्रण? Donald Trump oth Ceremony।
माध्यमातील माहितीनुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशिवाय, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, एल साल्वाडोरचे अध्यक्ष अरमांडो बुकेले आणि अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मायले यांना ट्रम्प यांच्या टीमने आतापर्यंत शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. जगातील अनेक लहान-मोठ्या नेत्यांना निमंत्रित केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
ट्रम्प यांना शपथविधी सोहळा ‘ग्लोबल इव्हेन्ट’ का बनवायचाय ?
डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी देशाचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. ते दुसऱ्यांदा या पदाची शपथ घेणार आहेत. त्यांचाही हा शेवटचा टर्म असेल. अशा परिस्थितीत त्यांचा कार्यकाळ संस्मरणीय आणि ऐतिहासिक बनवण्यासाठी त्यांनी शपथविधी सोहळा ‘ग्लोबल इव्हेन्ट’ म्हणून सादर करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, “अमेरिकेच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधी सोहळ्यासाठी परदेशी पाहुण्याला आमंत्रित करण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत ट्रम्प यांना ही नवीन परंपरा सुरू करून ट्रेंड सुरू करायचा आहे.”
ट्रम्प यांनी जिंकली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक Donald Trump oth Ceremony।
रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव करून अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. एकूण 538 पैकी बहुमतासाठी 270 किंवा त्याहून अधिक मते आवश्यक आहेत. ट्रम्प यांना 301 तर कमला हॅरिस यांना इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या मते, सुमारे 93 टक्के मतांची मोजणी झाली आहे. मतांच्या टक्केवारीचा विचार करता ट्रम्प यांना ५०.६ टक्के मते मिळाली तर हॅरिस यांना ४७.९ टक्के मते मिळाली.
हेही वाचा
प्रियांका गांधी लोकसभेत पहिल्यांदाच करणार भाषण ; संविधानावरील चर्चेत विरोधीपक्षाद्वारे करणार सुरुवात