Donald Trump on Sunita Williams । नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. दोन्ही अंतराळवीर आज भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. १७ तासांच्या प्रवासानंतर अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. दरम्यान , त्यांच्या पृथ्वीवर आगमनाने जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमचे स्वागत करत अभिनंद केले.
What a sight! The parachutes on @SpaceX‘s Dragon spacecraft have deployed; #Crew9 will shortly splash down off the coast of Florida near Tallahassee. pic.twitter.com/UcQBVR7q03
— NASA (@NASA) March 18, 2025
जे वाचन दिले ते पूर्ण केले Donald Trump on Sunita Williams ।
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुनीता विल्यम्स यांच्या आगमनावर प्रतिक्रिया देताना, ‘जेव्हा मी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पदावर आलो तेव्हा मी एलॉन मस्क यांना सांगितले की आपल्याला त्यांना (सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर) परत आणावे लागेल. बायडेनने त्यांना सोडून दिले आहे. आता ते परत आले आहेत. ते बरे झाल्यानंतर ओव्हल ऑफिसमध्ये (राष्ट्रपती कार्यालयात) त्यांची भेट घेण्यात येईल. असे त्यांनी म्हटले . पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी, मी जे वाचन दिले होते ते पूर्ण केले आहे.” असेही म्हटले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ९ महिने अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना वाचवण्याचे आश्वासन दिले होते. आज त्या पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरल्या आहेत. एलॉन मस्क, स्पेसएक्स आणि नासाचे आभार.” असे म्हणत त्यांनी नासाच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
फ्लोरिडाच्या समुद्रकिनारी यशस्वी लँडिंग Donald Trump on Sunita Williams ।
दरम्यान, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडल्यानंतर काही तासांतच म्हणजेच आज अंतराळवीरांच्या स्पेसएक्स कॅप्सूलने मेक्सिकोच्या आखातात पॅराशूटने उड्डाण केले. फ्लोरिडातील टालाहासीच्या किनाऱ्याजवळ ही लँडिंग झाली. अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडिओ देखील जारी केला आहे.