Donald Trump on Kamal Harris । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी त्यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या नावाला पाठिंबा दिला. बायडेन निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांनी, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी, 81 वर्षीय जो बायडेन यांच्यापेक्षा कमला हॅरिसचा पराभव करणे सोपे आहे” असे म्हणत स्वतःच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
एका इंग्रजाची वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, ट्रम्प यांनी, बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष आहेत.असे म्हणत टीका केली. तसेच उपराष्ट्रपती कमला हॅरिसला बिडेन यांच्यापेक्षा पराभूत करणे सोपे जाईल.असा दावा यावेळी त्यांनी केला. त्यांच्या ‘ट्रुथ’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी बायडेन यांना हुशार म्हटले आणि ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी योग्य नसल्याचेही सांगितले.
ट्रम्प यांच्या मुलाच्याही निशाणावर कमला हॅरिस Donald Trump on Kamal Harris ।
डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा ट्रम्प ज्युनियरने कमला हॅरिस यांना बायडेनपेक्षा ‘कमी सक्षम’ म्हटलंय. “कमला हॅरिस यांच्याकडे जो बायडेनचे संपूर्ण डावे धोरण रेकॉर्ड आहे,”असे म्हटले आहे. ट्रम्प ज्युनियर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले की, “त्यांना सीमेचा प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आणि आम्ही आमच्या इतिहासातील बेकायदेशीर लोकांचे सर्वात वाईट आक्रमण पाहिले.”असे त्यांनी म्हटले.
जो बायडेनने आपला निर्णय का बदलला? Donald Trump on Kamal Harris ।
दरम्यान,जो बायडेन यांनी आपण अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. जूनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या वादात त्यांनी अत्यंत खराब कामगिरी केली. तेव्हा त्यांचा हा निर्णय समोर आला. सूत्रांनी सांगितले की, निवडणुकीची आकडेवारी पाहिल्यानंतर जो बायडेन यांनी आपला विचार बदलला, कारण त्यातून विजयाची शक्यता कमी होत असल्याचे दिसून आले. यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला त्रास होऊ नये, अशी त्यांची इच्छा होती.
हेही वाचा
अखेर जो बायडेन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार