Business News : ट्रम्प भारताचे मित्र, US-India संबंधावर नकारात्मक परिणाम होणार नाही – पियुष गोयल

नवी दिल्ली – अमेरिकेच्या अध्यक्षपदावर निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प भारताचे मित्र आहेत. त्यामुळे अमेरिका-भारत संबंधावर नकारात्मक परिणाम होणार नाही असा दावा केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. ते म्हणाले की, मोदी सरकारने ट्रम्प यांच्याबरोबरच ओबामा आणि जो बायडेन सरकारबरोबर काम केले आहे. या कालावधीत भारत-अमेरिका संबंध अधिक वाढले आहेत. त्यामुळे आगामी काळातही हे दोन देश परस्परांना पूरक वातावरण तयार करतील.
कार्बन उत्सर्जन जास्त असलेल्या प्रदेशातून आयात कमी करण्याचा निर्णय युरोपियन समुदायाने घेतला आहे. हा निर्णय दुर्दैवी असल्याचे गोयल यांनी सांगितले. यासंदर्भात आम्ही युरोपियन समुदायाशी चर्चा करीत आहोत. भारत स्वतः उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र भारतावर असे निर्णय लादले तर भारत सहन करणार नाही असे सांगितले.
दरम्यान अमेरिकेतील टेस्ला कंपनीचे प्रमुख अॅलॉन मस्क यांनी टेस्ला कंपनी किंवा स्टार लिंक कंपनीने गुंतवणूक भारतात करण्याचा कसलाही निर्णय घेतलेला नाही. या विषयावर अद्याप कसलीही चर्चा चालू त्यानी नसल्याचे स्पष्ट केले.
Taxation in India | कराचे टप्पे कमी करण्याची गरज, तज्ञांची अर्थ मंत्रालयाला सूचना…
टेस्ला संदर्भातील निर्णय आणि स्टार लिंक संदर्भातील निर्णय इतर दोन मंत्रालयाशी संबंधित आहेत. त्यामुळे मी या विषयावर जास्त बोलू शकणार नाही. मात्र या विषयावर चर्चा झाली नसल्याचे आपल्याला समजते. एप्रिल महिन्यात मस्क भारताला भेट देणार होते. मात्र अचानक त्यांनी भारत भेट रद्द केली. भारताबरोबर गुंतवणूकीबाबत होत असलेली चर्चा यामुळे रुळावरून घसरली असल्याचे समजले जाते. मस्क यांना भारतीय धोरणाच्या चौकटीतच काम करावे लागेल असा आग्रह भारताने केलेला आहे.





