अहमदाबाद : अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोटेरा स्टेडियम’कडे रवाना झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मोटेरा स्टेडियम सज्ज झाले आहे. हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये एकाच वेळी दोन लाख नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी थोड्या वेळापूर्वी साबरमती आश्रमाला भेट दिली. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, पंतप्रधान नरेंद मोदी उपस्थित होते. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांची चरखा चालवत सूतकताई केली. थोड्याच वेळात त्याचे मोटेरा स्टेडियवर आगमन होईल.