Donald Trump New Meme Coin: डोनाल्ड ट्रम्प पुढील काही तासांमध्ये पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र, व्हाइट हाऊसमध्ये परतण्याआधी त्यांनी $TRUMP नावाचे मीम कॉइन लाँच केले आहे. या नवीन मीम कॉइनने क्रिप्टो बाजारात खबळबळ उडून दिली आहे. लाँच होताच अवघ्या काही तासांमध्ये या नवीन क्रिप्टोकरन्सीची किंमत गगनाला भिडल्याचे पाहायला मिळाली.
$TRUMP मीम कॉइन सोलाना नेटवर्कवर लाँच करण्यात आले आहे. अशा जवळपास 1 अब्ज टोकनची निर्मिती केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात सध्या 20 कोटी कॉइन उपलब्ध करण्यात आलेत. पुढील 3 वर्षात टप्प्याटप्प्याने उर्वरित टोकन जारी केले जाणार आहेत.
राष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याच्या काही तास आधीच ट्रम्प यांनी हे कॉइन लाँच करत असल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. लाँचनंतर अवघ्या काही तासातच या मीम कॉइनने बाजारात धुमाकूळ घातला आहे. या मिम कॉइनची किंमत 0.18 डॉलर एवढी होती. मात्र, अवघ्या काही मिनिटातच याचे मुल्य 21.51 डॉलरवर पोहोचले आहे. काही मिनिटांमध्येच कॉइनची किंमत 300 टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्याचे पाहायला मिळाले. याची ट्रेडिंग व्हॉल्यूम जवळपास 1 बिलियन डॉलर एवढी होती. या मिम कॉइनचे मार्केट व्हॅल्यूएशन जवळपास 8 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे.
My NEW Official Trump Meme is HERE! It’s time to celebrate everything we stand for: WINNING! Join my very special Trump Community. GET YOUR $TRUMP NOW. Go to https://t.co/GX3ZxT5xyq — Have Fun! pic.twitter.com/flIKYyfBrC
— Donald J. Trump (@realDonaldTrump) January 18, 2025
रिपोर्टनुसार, एका ट्रेडरने हे मीम कॉइन लाँच होताच USDC वापरून 1.1 मिलियन डॉलर्समध्ये जवळपास 60 लाख कॉइन खरेदी केले व त्यानंतर अवघ्या काही सेकंदात त्याची गुंतवणूक तब्बल 23 मिलियन डॉलरवर पोहोचली.
रिपोर्टनुसार, 80% ट्रम्प मीम कॉइन हे CIC Digital LLC आणि Fight Fight Fight LLC नावाच्या कंपन्यांकडे आहेत. या कंपन्या ट्रम्प ऑर्गनायझेशनशी संबंधित आहेत. ट्रम्प यांच्या या मीम कॉइनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ट्रम्प हे पुन्हा एकदा व्हाइट हाउसमध्ये परतणार असल्याने क्रिप्टो बाजाराला याचा फायदा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे या मीम कॉइनबाबत शंका देखील उपस्थित केली जात आहे.