अफगाणिस्तानातून पूर्ण सैन्य माघारी घेणार नाही – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – 2016 मधील अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी अमेरिकेचे अफगाणिस्तानातील सैन्य माघारी घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गुरूवारी बोलताना त्यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सर्व सैन्य काढून घेतले जाणार नाही, कारण तालिबान पुन्हा त्या देशाचा ताबा घेणार नाही याची काळजी घेणे आम्हाला भाग आहे, असे म्हणत आपलेच शब्द पुन्हा एकदा फिरवले आहेत.

ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिस येथे पत्रकारांना सांगितले की, आमच्या गुप्तचर यंत्रणा सक्षम आहेत. सैन्य माघारीनंतरही आमचे कुणीतरी नेहमीच अफगाणिस्तानात राहील. तालिबान व अफगाणिस्तान यांच्यातील शांतता वाटाघाटींबाबत प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, आम्ही आता योग्य मार्गावर आहोत. काही पर्याय समोर आहेत. त्यातील नवा प्रस्ताव त्यांना मंजूर आहे की नाही, ते माहिती नाही. कदाचित त्यांना तो पटणार नाही पण आम्ही चर्चा करीत राहू. इतर अध्यक्षांनी केले नाही त्यापेक्षा अधिक मी केले. आम्ही सैन्य कमी केले पण काही प्रमाणात आमचे अस्तित्व कायम राहील. आम्ही पूर्णपणे माघार घेणार नाही. तालिबानचे पूर्ण नियंत्रण असलेला अफगाणिस्तान तुम्हाला मान्य आहे काय, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, “काय होते ते बघू या. वाटाघाटीतून काय बाहेर येते ते बघू, नंतर ठरवू.’ 2001 पासून आतापर्यंत युद्धग्रस्त अफगाणिस्तानात अमेरिकेचे 2400 सैनिक मारले गेले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×