वॉशिंग्टन – इराणने अमेरिकेचे शक्तीशाली ड्रोन पाडल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष ‘डोनाल्ड ट्रम्प’ संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ‘इराणने खूप मोठी चूक’ केल्याचे ट्वीट केले आहे.
Iran made a very big mistake!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) June 20, 2019
मात्र, अमेरिकेचे ड्रोन पाडल्यामुळे या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर्वीच इराण आणि अमेरिका या देशांमध्ये वादग्रस्त परिस्थिती होती.