Donald Trump । डोनाल्ड ट्रम्प येत्या २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. पण या शपथविधी पूर्वीच ट्रम्प चांगलेच ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे दिसत आहेत. त्यांनी मेक्सिको आणि कॅनडासारख्या देशांवर कर लादण्याबद्दल बोललोय नंतर त्यांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे.
एका इंग्रजीवृत्तवाहिनीवर , ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी बाह्य महसूल सेवा (External Revenue Service) नावाचा एक नवीन सरकारी विभाग सुरू करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. या विभागाचे काम परदेशातून येणारे उत्पन्न आणि वेळेवर लादण्यात येणारे शुल्क गोळा करणे असेल. या विभागाअंतर्गत, परकीय स्रोतांमधून मिळणारे कस्टम, टॅरिफ आणि इतर उत्पन्न गोळा केले जाणार आहे.
व्यापार असंतुलन, स्थलांतर आणि अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या समस्या सोडवता याव्यात यासाठी कॅनडा, मेक्सिको आणि चीनसारख्या देशांवर दबाव आणण्यासाठी हा विभाग स्थापन केला जात असल्याचे मानले जाते. याशिवाय, ट्रम्प चीनसह इतर अनेक देशांच्या उत्पादनांवर कर वाढवण्याचा मानस करतात. असेही म्हटले जात आहे की ट्रम्प लवकरच इतर देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याची घोषणा करू शकतात.
‘या’ देशाची चिंता वाढणार Donald Trump ।
याआधी ट्रम्प यांनी अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क आणि भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) ची जबाबदारी सोपवली होती. या विभागाचे काम अनेक जुन्या धोरणे आणि समित्या संपवणे आणि संपूर्ण संघराज्य रचनेत आवश्यक बदल करणे असेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्पष्ट केले होते की, जर ते अध्यक्ष झाले तर देशात व्यापक बदल होतील. या बदलांसाठी, त्यांनी या विशेष टीममध्ये एलोन मस्क आणि विवेक रामास्वामी यांचा समावेश केला, ज्यांच्या अजेंड्यावर अनेक कामे आहेत जी अंमलात आणण्याची आवश्यकता आहे.
आपल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प म्हणाले होते की,” सध्याच्या सरकारवर नोकरशाहीचे वर्चस्व आहे. पण जर ते अध्यक्ष झाले तर मोठे बदल होतील. अशा परिस्थितीत, DOGE प्रथम अमेरिकन राजकीय व्यवस्थेतील नोकरशाहीची आंधळी प्रथा संपवण्याचे काम करेल. मस्क आणि रामास्वामी ते संपवण्याचा प्रयत्न करतील” असे त्यांनी म्हटले होते.
DOGE म्हणजे काय? Donald Trump ।
आता DOGE म्हणजे काय? आणि ट्रम्पच्या नवीन विभागाचे नाव कुठून आले? खरंतर डोगेकॉइन ही एक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे आणि ती २०१३ मध्ये तयार करण्यात आली होती. डोगेकॉइन २०१३ मध्ये बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी लाँच केले होते. त्यात शिबा इनू श्वानाचा फोटो लावण्यात आला.
डोगेकॉइन बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीची खिल्ली उडवण्यासाठी तयार करण्यात आले होते, परंतु ही क्रिप्टोकरन्सी २०२१ मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली. ती प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण देखील एलोन मस्क होते. त्यांनीच या चलनाबद्दल ट्विट करायला सुरुवात केली आणि लोक त्याकडे लक्ष देऊ लागले. डोगेकॉइनच्या लोगोला डोगे असे म्हणतात. त्याचे मीम्स व्हायरल झाल्यानंतर, क्रिप्टोकरन्सी समुदायातील लोकांनी त्यात रस दाखवायला सुरुवात केली.