डोमेस्टिक आटा चक्‍कीचे हक्काचे दालन

नयन एजन्सीज पुण्यातील नयन एजन्सीजने
घरगुती पिठाच्या गिरणीचे(डोमेस्टिक) विनोद आटा चक्की या नावाने आपले उत्पादन बाजारात आणले आहे.पाहताक्षणी मनाला भूरळ पडणाऱ्या सात ते आठ प्रकारचे सुबक चक्की मॉडेल्स, आकर्षक डिझाईन रंगसंगतीत उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती देखील बाजारपेठेतील इतर घरगुती गिरण्यांपेक्षा अतिशय वाजवी स्वरूपाच्या आहेत. या चक्कीचे वैशिष्ट म्हणजे कमी विजेचा वापर, भेसळमुक्‍त शुद्ध पीठ, दळण बाहेरून दळून आणण्याच्या कष्टातून सहज सुटका, सगळ्यात महत्त्वाचे आपल्या सोयीने दळण दळता येते.

या चक्कीमध्ये बावीस प्रकारची धान्ये दळता येतात.या चक्कीची मोटार आयएसआय मार्क असून याच्या ब्लेड चेंबर्सची लाईफ टाईम गॅरन्टी दिलेली आहे. विक्री पश्‍चात तत्पर सेवा व एक वर्षे फ्री होम सर्व्हिससुद्धा देण्यात येत आहे. गेले पन्नास वर्षे ग्राहकांचा विश्‍वास संपादन करीत ग्राहकांशी आपुलकीचे नाते जोडण्याची परंपरा जोपासणारी पुण्यातील एकमेव संस्था म्हणजे नयन एजन्सीज डोमेस्टिक आटा चक्कीचे जणू माहेरघर बनले आहे. खरेदी करण्यासाठी शुक्रवार पेठेतील शिवाजी रस्त्यावरील नयन एजन्सीमध्ये एकदा अवश्‍य भेट द्या, असे आवर्जून सांगितले जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.