पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित आठव्या पीवायसी-पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत डॉल्फिन्स, जॅगवॉर्स संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत सलग तिसरा विजय मिळवला.
या स्पर्धेत साखळी फेरीत डॉल्फिन्स संघाने बुल्स संघाचा 5 गडी राखून पराभव करत विजयाची हॅटट्रिक नोंदवली. अन्य लढतीत चिताज संघाने वुल्वस् संघाचा 20 धावांनी पराभव करून दुसरा विजय नोंदवला.
जॅग्वॉर्स संघाने ओकटोपाय संघाचा 7 गडी राखून पराभव करत तिसरा विजय मिळवला. टायगर्स संघाने बोबकॅट्स संघाचा 8 गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला.