नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असली असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांचा टक्का देखील वाढतोय. कोरोनाला रोखण्यासाठी लॉक डाऊनच्या देशव्यापी चार टप्प्यानंतर अखेर दोन आठवड्यांपूर्वी अनलॉक-१ ला सुरुवात करण्यात आली.
अनलॉक-१ मध्ये सावधगिरी बाळगत बऱ्याच आस्थापना सुरु करण्यात आल्या असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील काही प्रमाणात सुरु करण्यात आलीये. महत्वाचं म्हणजे अनलॉक-१ मध्ये देशांतर्गत नागरी विमान वाहतुकीस परवानगी देण्यात आलीये. मात्र देशात सापडलेल्या बहुसंख्य कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणं आढळत नसल्याचं दिसतंय. यामुळेच सार्वजनिक वाहतूक करताना अशा अलाक्षणिक व्यक्तींच्या संपर्कात आल्यास कोरोनाचा प्रसार वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येतीये.
याच पार्श्वभूमीवर आज एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी एक महत्वपूर्ण दावा केला आहे. गुलेरिया यांनी, ‘जर तुम्ही विमान प्रवास करत असताना तुमच्या शेजारी कोरोनाचा अलाक्षणिक रुग्ण बसला असेल व तुम्ही दोघांनीही फेस मास्क व फेस शिल्ड लावले असेल तर कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता कमी होते.’ असा दावा केला आहे.
तत्पूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या एका संशोधनात, सार्वजनिक ठिकाणी वावरताना फेस मास्कचा व्यापक वापर केल्यास कोरोनाव्हायरसच्या पुनरुत्पादनाची संख्या 1.0 च्या खाली ठेवता येऊ शकेल असा दावा करण्यात आला होता. गुलेरिया यांचा दावा देखील फेस मास्क व फेस शिल्डच्या वापरामुळे कोरोना प्रसारास आला घालणे शक्य आहे हेच अधोरेखित करतो.
If an asymptomatic person is seating next to you during a short flight and both the persons are wearing masks and face shields, there is less chance of spreading of virus: Dr. Randeep Guleria, AIIMS Director. #COVID19 (File pic) pic.twitter.com/hYEaMXf0SZ
— ANI (@ANI) June 16, 2020