fbpx

बारामतीत चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला!

जळोची (वार्ताहर) – शहरातील समर्थनगर परिसरातील इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळ असलेल्या सात वर्षांच्या मुलीवर आठ ते दहा मोकाट कुत्र्यांनी हल्लाकरून लचके तोडले आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 25) घडली.
अलीना इमरान बागवान( वय 7) असे जखमी मुलीचे नाव आहे. आठ ते दहा मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढवित तिला पार्किंगमधून फरफटत बाहेर मोकळ्या पटांगणात आणत लचके तोडले.

वेळीच हा प्रकार चिमुकलीच्या वडिलांनी व शेजाऱ्यांनी पाहिला असता त्यांनी धावत जाऊन मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून चिमुकलीला सोडविले व तिचा प्राण वाचविला. जखमी मुलीला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोकाट कुत्र्यांबद्दल वेळोवेळी चर्चा होते आणि ती हवेतच विरते. शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात नगरपालिकेला वेळोवेळी निवेदने दिले. मोर्चे काढले मात्र अद्याप मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेला बंदोबस्त करता आलेला नाही. शहरात मोकटा कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. आज झालेल्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्‌यासारखी एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच प्रशासनासमोर आंदोलन वगैरे केले जाते.

त्यानंतर ठरल्याप्रमाणे प्रशासन संतप्त नागरिकांना कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्‍वासन देते. नंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत असते. अशा कुत्र्यांच्या प्रश्‍न कायमस्वरुपी मिटवण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.