DOGE Cancels Funding | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यापासून निर्णयाचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांनी सरकारच्या बजेटमधील अनावश्यक खर्चात कपात करण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट इफिशिएन्सी (DOGE) या विभागाची स्थापना केली आहे. या विभागाचे जबाबदारी अब्जाधीश इलॉन मस्क यांच्याकडे आहे.
इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील DOGE ने आता अमेरिकेकडून अनेक देशांना दिला जाणारा निधी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला दिला जाणार 21 मिलियन डॉलर (जवळपास 1 अब्ज 82 कोटी रुपये) एवढा निधी रद्द करण्यात आल्याची माहिती DOGE यांनी ट्विट करत दिली आहे. या निधीचा वापर भारतात लोकशाही पद्धतीने पार पडणाऱ्या निवडणुकीतील मतदान वाढवण्यासाठी होणार होता.
US taxpayer dollars were going to be spent on the following items, all which have been cancelled:
– $10M for “Mozambique voluntary medical male circumcision”
– $9.7M for UC Berkeley to develop “a cohort of Cambodian youth with enterprise driven skills”
– $2.3M for “strengthening…— Department of Government Efficiency (@DOGE) February 15, 2025
इलॉन मस्क हे अत्यंत बारकाईने संपूर्ण जगभरात अमेरिकेद्वारे दिल्या जाणाऱ्या निधीची तपासणी करत आहेत. तसेच, सरकारच्या धोरणांनुसार अनावश्यक खर्च रद्द करत आहे. ‘अमेरिकी करदात्यांचा पैसा पुढील कारणांसाठी खर्च केला जाणार होता, परंतु यातील सर्व खर्च रद्द करण्यात आले आहेत.’, अशी माहिती DOGE ने ट्विटरवर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर त्वरितच हा निर्णय घेण्यात आला आहे.
DOGE ने ट्विटरमध्ये दिलेल्या माहितीमध्ये भारताला दिल्या जाणाऱ्या 21 मिलियन डॉलर निधीचा देखील उल्लेख आहे. हा निधी भारतातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी दिला जाणार होता. याशिवाय, या लिस्टमध्ये कंबोडिया, नेपाळ, माली, लायबेरिया, बांगलादेशसह अनेक देशांच्या नावाचा उल्लेख आहे. या देशांना दिला जाणार निधी देखील रोखण्यात आला आहे.
दरम्यान, या निधीबाबत माहिती समोर आल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. निधीच्या माध्यमातून भारतासह इतर देशांच्या राजकीय प्रक्रियेतील अमेरिकेच्या हस्तक्षेपाबाबत प्रश्न निर्माण होतात.