पिंपरी – भटक्या श्वानाला इमारतीवरून खाली फेकून ठार मारले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे शनिवारी (दि. 12) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.
फरीनजहॉं विशाल शेख (वय 23, रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अज्ञात व्यक्तींनी एका भटक्या श्वानाला इमारतीच्या टेरेसवरून खाली फेकून दिल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला.