दहशतवाद्यांच्या शोधासाठी श्‍वान पथकांची मदत

जम्मू – जम्मू काश्‍मीर राज्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी श्‍वान पथकाची मदत सध्या घेतली जात आहे. किश्‍तवार जिल्ह्यातील जंगलांमध्ये श्‍वान पथके फिरवून तेथे सध्या हा शोध घेतला जात आहे. शुक्रवार सकाळपासून हा शोध घेतला जात आहे. लष्कर आणि स्थानिक पोलिसांची पथके त्यासाठी कार्यरत आहेत.

या जंगलांमध्ये दहशतवाद्यांनी काही ठिकाणी आपले अड्डे बनवले असल्याची माहिती आहे. ही शोध मोहीम सुरू असताना काल एकेठिकाणी लपलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये किरकोळ चकमकही झाली. यात एक दहशतवादी जखमी झाला पण त्याला घेऊन त्याचे अन्य साथीदार तेथून फरारी झाला. त्यांचाही अजून शोध सुरू आहे.

जंगलात काही ठिकाणी मानवी रक्ताचे डाग आढळून आहेत त्या आधारे त्यांचा माग काढण्यासाठी श्‍वानांचा उपयोग केला जात आहे. किश्‍तवार जिल्हा हा एका दशकापुर्वी दहशतवादी मुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता.पण आता तिथे पुन्हा दहशतवाद्यांनी आपले बस्तान बसवले असल्याचे लक्षात आल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.