क्वालालंपूर – मलेशियात करोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. या विषाणूचा संसर्ग श्वानांपासून झाल्याची माहिती समोर येत असून काही वर्षांपूर्वी काही जणांना याची बाधा झाली होती.
प्राण्यांपासून माणसांना बाधित करणाऱ्या या विषाणूची पुष्टी झाल्यास असा हा 8 वा विषाणू असेल, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. सध्या जगभरात मनुष्यामध्ये संसर्ग पसरवू शकतात, असे करोना विषाणूचे 7 प्रकार आहेत.
विषाणूतज्ञ अनस्तासिया व्लासोवा म्हणाले, श्वानांमधून माणसांमध्ये करोना विषाणू संक्रमित होईल, असा विचारही कधी कुणी केला नसेल. अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण अद्याप पुढे आलेले नाही.
मलेशियात श्वानांपासून करोनाबाधित झालेले सर्व रुग्ण बरे झाले आहेत. त्याखेरीज त्यांना या संसर्गाची बाधा झाल्यानंतर त्यांच्याकडून इतरांना बाधा झाल्याचेही आढळलेले नाही. त्यामुळे श्वानांमधील करोना विषाणूपासून साथ पसरण्याचा धोका नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.