जमावाला कायदा बदलून हवा की कायदा बिघडवायचा आहे?;निलेश राणे भडकले

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. दिल्लीतील विविध ठिकाणी शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापटी झाल्या. दरम्यान, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला ज्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करण्यात येते त्याच लाल किल्ल्यावर आंदोलनाचे हिंसक पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, लाल किल्ल्यात हिंसक आंदोलकांनी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा एक भयानक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी ‘पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?’ असा संतप्त सवाल केला आहे.

“पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं? पोलिसांना पाहिजे तेव्हा त्यांनी जागा रिकामी केली असती. पण आजपर्यंत माणुसकी दाखवली. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं हे कुठलाही शेतकरी करू शकत नाही. या जमावाला कायदा बदलून हवा की कायदा बिघडवायचा आहे?,” असा सवाल निलेश राणे यांनी केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली संतप्त प्रतिक्रिया दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.