भाजपला बहुसंख्याकाच्या भावनांशी काही देणेघेणे नाही का? – कॉंग्रेसचा सवाल

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत एका मंदिराची मोडतोड करण्यात आली पण त अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा दिल्ली पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाहीं. हा प्रकार पहाता देशातल्या बहुसंख्याकांच्या भावनांविषयी भाजपला काही देणेघेणे आहे की नाही असा सवाल कॉंग्रेसने केला आहे.

रविवारी रात्री हौज खास भागातील मंदिराची मोडतोड झाली आहे. त्यावरून त्या भागात मोठा तणाव पसरला आहे. आता या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती दिल्लीचे पोलिस आयुक्त अमुल्य पटनाईक यांनी दिली. स्कुटर पार्किंगच्या वादंगातून तेथे हा प्रकार घडला असून त्या ठिकाणी नंतर दोन धर्मिय लोकांमध्ये हिंसाचारही घडला आहे. या संबंधात कॉंग्रेसने म्हटले आहे की मंदिर तोडण्याची घटना होऊन दोन दिवस होऊन सुद्धा गृहमंत्र्यांनी त्याविषयी कोणतीही भूमिका घेतलेली नाही किंवा कारवाई केलेली नाही.

आज गृहमंत्र्यांनी दिल्लीच्या आयुक्‍त्यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले की आता तेथील स्थिती नियंत्रणाखाली आहे. या प्रकाराचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या विषयीची माहिती घेतली जात आहे असे आयुक्‍त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.