नवी दिल्ली – देशभरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच राजस्थानमध्ये धक्कादायक समोर आला आहे. एका सरकारी रुग्णालयात गर्भवती महिला मुस्लिम असल्य़ामुळे तिच्यावर उपचार डॉक्टरांनी नकार दिला. यामुळे नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.
राजस्थान येथे भरतपूरमधील सरकारी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. गर्भवती महिला मुस्लिम असल्याने तिला प्रवेश नाकारला. यामुळे या महिलेला रुग्णवाहिकेतच मुलाला जन्म द्यावा लागला, मात्र या नवजात बालकाचा मृत्यू झाला.
महिलेचे पती इरफान खान यांनी सांगितले की, माझ्या गर्भवती पत्नीला रुग्णवाहिकेत बाळाला जन्म द्यावा लागला, तिला सिक्री येथील रुग्णालयात डॉक्टरांनी मुस्लिम असल्यामुळे जयपूरला जा, असे सांगितले.
Rajasthan: A pregnant woman was allegedly denied admission into Janana Hospital, Bharatpur citing her religion.Her husband says,”hospital staff referred us to a hospital in Jaipur as we are Muslims.We didn’t even cross Bharatpur, she delivered the child on the way&the baby died” pic.twitter.com/bv3oLsEbCM
— ANI (@ANI) April 5, 2020
दरम्यान, भरतपूर रुग्णालयाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिलेला सध्या भरतपूरच्या झानाणा रुग्णालयात दाखल केले आहे. झानाणा रुग्णालयाचे प्राचार्य डॉ.रुपेंद्र झा यांनी सांगितले की, या महिलेची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जयपूरला पाठवण्यात आले आहे.