शस्त्रक्रिया करताना डॉक्टरचा झूम सुनावणीमध्ये सहभाग

न्यायालयाने घेतली गंभीर दखल

वॉशिंग्टन – अमेरिकेतील एका डॉक्टरने रुग्णावर शस्त्रक्रिया करत असतानाच न्यायालयात सुरू असलेल्या व्हर्च्युअल न्यायालयीन सुनावणीत सहभाग घेतल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे कॅलिफोर्निया येथील या डॉक्टरचे नाव स्कॉट ग्रीन असे असून तो प्लास्टिक सर्जन आहे.

वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याबद्दल एका न्यायालयात सुनावणी सुरू असताना या डॉक्टरांनी रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच झुमच्या माध्यमातून सुनावणीमध्ये भाग घेतला करोना महासंकटामुळे अमेरिकेतील बहुतेक न्यायालयांमध्ये डिजिटल माध्यमातून सुनावणी सुरू आहे.

त्या प्रमाणे ही सुनावणी सुरू असताना झुमच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर स्कॉट ग्रीन डॉक्टरच्या पेहरावात एका पेशंटवर शस्त्रक्रिया करताना दिसले यावर न्यायालयाने  त्यांना प्रश्न करून याबाबतची वस्तुस्थिती विचारली आपण न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित आहात का रूग्णालयात शस्त्रक्रिया करत आहात असा स्पष्ट शब्दात न्यायालयाने विचारणा केली डॉक्टर ग्रीन यांनी मी शस्त्रक्रिया करत करत सुनावणीसाठी उपस्थित आहे.

असे उत्तर दिले माझ्यासोबत आणखीन एक डॉक्टर असून तोही शस्त्रक्रियेला सहाय्य करत आहे असा खुलासाही त्यांनी केला अर्थात न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली आणि सुनावणी स्थगित केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना डॉक्टरचे हे  वर्तन बेजबाबदारपणाचे वाटले आणि संबंधित रुग्णाने डॉक्टरच्या विरोधात कारवाई करावी अशा प्रकारच्या सूचनाही करण्यात आल्या या डॉक्टरने असा बेजबाबदारपणा दाखवल्यामुळे त्याचे वैद्यकीय लायसन्स रद्द होण्याचा धोकाही व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.