येरवडा : करोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्ववभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी डॉक्टर आपल्या दारीं हे अभियान राबविण्यात आले. प्रभाग क्रमांक 6 मध्ये नगरसेवक अविनाश साळवे, भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, यांच्या संयुक्त विद्यमाने भाट नगर, यशवंत नगर, नेताजी नगर येथे डॉक्टर आपल्या दारी अभियान सुरु करण्यात आले.
मोफत आरोग्य तपासणमध्ये जवळपास 306 नागरिकांची तपासणी करण्यात आली. आणखीही पुढील काही दिवस घेण्यात येणार आहे. ही आरोग्य तपासणी डॉ. मनोहर कराचीवाला, डॉ.सपना रावळकर यांच्या मार्फत करण्यात आली. या अभियानासाठी कीर्ती माछरेकर, अर्चना माछरेकर यांनी पुढाकार घेतला. उपक्रम यशस्वी होण्यासाठी सुखदेव तामचीकर, रोहन घमंडे, कपिल माछरेकर, गणेश माचरे, निखिल मिणेकर, विजय राजरत्न आदींनी सहकार्य केले.
दरम्यान, कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या घातक विषाणूमुळे आतापर्यंत २७ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे तर, जगभरात या विषाणूचे २० लाखपेक्षा अधिक रुग्ण आहेत. जगभरात आतापर्यंत या विषाणूपासून ४ लाख ८६ हजार जण बरे झाले आहेत.
तर दुसरीकडे अमेरिकेनं डब्ल्यूएचओचा आर्थिक निधी बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने निधी थांबवल्याप्रकरणी ‘चीन’ने चिंता व्यक्त केली आहे. मागील २४ तासात अमेरिकेत २ हजार २२८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.