पुणे – करोना निदान झाल्यानंतर डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याची घटना वानवडी भागात घडली. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
याप्रकरणी असिफ कादीर शेख (33), जैद जुनेद घोडके (20), अश्फाक आफताब फराश (22), अजिंक्य दत्तात्रय भांगे (28, चौघे रा. कोंढवा) यांना अटक केली आहे. याबाबत डॉ. सोहेल खान (रा. कोंढवा) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. खान यांचे कोंढवा भागात रुग्णालय आहे.
आरोपींनी त्यांच्या नातेवाइकाला रुग्णालयात दाखल केले होते. डॉ. खान यांनी करोना निदान चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर चाचणीत रुग्ण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर आरोपींनी डॉ. खान यांना मारहाण केली. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.